ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर शहरात २० नव्या रुग्णांची नोंद

सोलापूर : आज सोलापूर शहरात  509 अहवालात 20 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मागील गेल्या काही दिवसापासून शहरात नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणार्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ७ पुरुष आणि १३ महिलांचा समावेश आहे. शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10,561 इतकी आहे, त्यापैकी ९ हजार ६१३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.शहरात आजपर्यंत एकूण 572 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान 376 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे.

या भागात आढळले नवे रुग्ण

शहरात आज गांधी नगर, बिलाल नगर (सैफूल), विष्णू प्रिया अपार्टमेंट, निर्मिती विहारजवळ (विजयपूर रोड), चौपाड (उत्तर कसबा), गणेश नगर (पुना नाका), गणेश नगर (पुना नाका), न्यू पाच्छा पेठ, भिमा नगर, विरशैव नगर (जुळे सोलापूर), सहारा नगर (होटगी रोड), लोकमान्य नगर, सोनिया नगर (विडी घरकूल), रोहिणी नगर, आकाशवाणी केंद्राजवळ आणि शासकीय वसाहत (कुमठा नाका) येथे नव्याने रुग्ण आढळले आहेत. रुग्णांच्या संपर्कातील 137 संशयित होम क्‍वारंटाईन असून 30 जण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. तर 26 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. दरम्यान, 15 डिसेंबरनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविल्याने शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचाराच्यादृष्टीने ठोस नियोजन करण्यात आले आहे. तरीही नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, गर्दीत जाणे टाळल्यास निश्‍चितपणे कोरोनाची दुसरी लाट येऊ शकणार नाही, असा विश्‍वासही आरोग्य विभागाने व्यक्‍त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!