ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी : अंबादास करगुळे यांचा सवाल,सोलापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीने नवी पेठेत बाईक रेस स्पर्धेचे आयोजन

 

सोलापूर, दि.१६ : सोलापुर महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरात सर्वत्र खड्डे पडले असुन या कारभाराचा निषेध करण्यासाठी आज नवी पेठ सरस्वती बुक डेपो बोळात येथे उपरोधात्मक MUD BIKE RACE (मोटार रेस) स्पर्धेचे आयोजन करुन निषेध व्यक्त केला.

सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे म्हणाले की, सोलापूर महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कुठलेही योग्य नियोजन न करता सोलापुर शहरात अनेक ठिकाणी रस्ते व ड्रेनेज व इतर कामे अतिशय संथगतीने सुरु असुन अनेक ठिकाणी खड्डे खणले आहेत, तसेच शहरात रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ते आहेत हेच समजेना त्यातच पावसामुळे सर्वत्र चिखल, दलदलीचा साम्राज्य पसरले असुन यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी त्रास होत आहे, नागरिक खड्यात पड़त आहेत, अपघात घडत आहेत अंगदुखीचे व इतर आजार शहरातील नागरिकांना होत आहेत, धुळीचा प्रचंड त्रास त्यामुळे ही नागरिकांना विविध आजार होत आहेत. शहरातील नागरिक संतप्त झाले आहेत. स्मार्ट सिटीचे कामे, निकृष्ट व अतिशय संथगतीने सुरु असुन सोलापूर आहे की खड्डेपुर हेच समजेना झाले. आजच माझ्या डोळ्यासमोर अपघात घडला. याचा निषेध म्हणून आज रोजी हे MUD BIKE RACE (मोटार रेस) आयोजित करुन शहरातील रस्ते या प्रकारचे आहेत हे दाखवून सोमपा मधील सत्ताधारी भाजपच्या कारभाराचा निषेध केला.

यावेळी नगरसेवक विनोद भोसले म्हणाले कि, सोलापुर शहरात सत्ताधारी भाजप आणि स्मार्ट सिटीचा अंधाधुंद कारभार सुरु असुन त्यामुळे, व दुर्लक्षामुळे शहरातील रसत्यांची दुर्दर्शा झाली आहे. जिथे बघेल तिथे खड्डे पडले आहेत शहराचे रस्ते हे टू व्हीलर, मोटार रेस साठीच तयार केले आहेत का? असा प्रश्न जनतेला पड़त आहे. सत्ताधाऱ्यांच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. एक महिन्यात रस्ते दुरुस्ती व इतर कामे पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.

यावेळी बोलताना प्रदेश सरचिटणीस सुमित भोसले म्हणाले की,सत्ताधारी भाजपवाल्यांनी शहराची अवस्था अतिशय वाईट करुन ठेवली आहे कुंभकर्णी झोप घेतलेल्या सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी, रस्त्याची अवस्था प्रत्यक्ष दाखविण्यासाठी आज आंदोलन केले आहे. लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास सोमपाच्या सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांना शहरात फिरु देणार नसल्याचा इशारा दिला.

यावेळी सोलापूर शहर युवक अंबादास  करगुळे, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, दक्षिण विधानसभा अध्यक्ष सैफन शेख, उत्तर अध्यक्ष विवेक कन्ना, महापालिका परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, महेश लोंढे, संजय गायकवाड़, राहुल गोयल, शाहु सलगर, शरद गुमटे, राजेन्द्र शिरकुल, सुभाष वाघमारे, सौरभ सालुंखे, व्यंकटेश बोम्मन, शिव कोरे, शंकर माढेकर, मनोज यादव, भीम बज्जर, मोनेश घंटे, मिथुन जंगम, सचिन हेगड़े, प्रज्वल कांबळे यांच्यासह नवी भागातील नागरिक, व्यापारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!