अक्कलकोट,दि.१५ : अक्कलकोट तालुका सकल मराठा समाजाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत २१ सप्टेंबरला शहर आणि तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.याद्वारे सरकारवर दबाव आणून सुप्रीम कोर्टातील स्थगिती उठविण्याचा निर्धार पदाधिकारी व नेते मंडळींनी केला.हा बंद कोविड १९ चे सर्व नियम पाळून शांततेने यशस्वी करावे, असे आवाहन बैठकीमध्ये करण्यात आले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीला सुरूवात करण्यात आली.यावेळी जेष्ठ नेते सुरेशचंद्र सुर्यवंशी,अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले,फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, माजी नगराध्यक्ष महेश इंगळे,पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, मनोज निकम, नितीन शिंदे, बाळासाहेब घाटगे, शितल फुटाणे,योगेश पवार,प्रवीण घाटगे आदि उपस्थित होते.यावेळी बोलताना सुरेशचंद्र सुर्यवंशी म्हणाले की, काही विघ्नसंतोषी लोकांमुळे आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे.ती उठवण्यासाठी आम्ही भाग पाडू. खरे तर ही जबाबदारी आता केंद्र व राज्य या दोन्ही सरकारची आहे,असे ते म्हणाले.बाबासाहेब निंबाळकर म्हणाले, सकल मराठा समाजाने केलेली सर्व आंदोलने यशस्वी झाली आहेत.यापुढच्या आंदोलनात आपण सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावे,असे आवाहन केले.
महेश इंगळे यांनी कोरोना काळात हे आंदोलन होत आहे त्यामुळेसर्व प्रकारची खबरदारी घेऊन हे आंदोलन करावे लागेल.
बाळासाहेब मोरे म्हणाले,सध्या याबाबतीत मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज संघटनेच्या वतीने जे काही ठरेल त्यापद्धतीने आंदोलने करावे लागतील.त्यासाठी समाजाने पाठीशी उभे राहावे,असे आवाहन केले.यावेळी प्रशांत भगरे,
सहदेव पाटील,विजय माने,सुरेश कदम, अतुल जाधव, मोहन चव्हाण, तम्मा शेळके यांनी मनोगत व्यक्त केले.
के.पी.गायकवाड प्रतिष्ठानचे प्रमुख राहुल गायकवाड यांनी देखील सकल मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला.
याप्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संचालक प्रशांत भगरे यांनी समाजातील युवकांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून पतपुरवठा करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.बैठकीला
याप्रसंगी प्रविण देशमुख,सतिश शिरसट, वैभव नवले, गणेश भोसले, प्रथमेश पवार, संजय गोंडाळ, गोविंद शिंदे, मनोज गंगणे, योगेश पवार, मंगेश फुटाणे, ज्ञानेश्वर भोसले, रवी कदम, सागर शिंदे, केदार तोडकर, प्रकाश जाधव, अमोल सुरवसे, भरत राजेगावकर, आकाश गडकरी, चेतन शिंदे, संभाजी पवार, रणजित गोंडाळ,निलेश शिंदे आदी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, आभार प्रा.प्रकाश सुरवसे यांनी मानले.