स्वच्छतेचे काम करणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांचा टोपी टॉवेल देऊन सत्कार,सोलापूरमधल्या ‘या’ नगरसेवकांनी दाखवली संवेदनशीलता
सोलापूर,दि.१८ : कोरोनाच्या संसर्गामुळे स्वच्छता आणि आरोग्याला खूप महत्व आले आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका देखील स्वच्छता व आरोग्याकडे लक्ष देऊ लागले आहे. त्याच बरोबर नागरीकही बऱ्यापैकी स्वच्छता आरोग्याबाबत जागरुक झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्र १९ नगरसेविका अनिताताई व्यंकटेश कोंडी यांच्या हस्ते स्वच्छतेचे काम करणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांचा टोपी टॉवेल देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोमपा झोन कार्यालय क्र ४ चे आरोग्य निरीक्षक रिजवान पटेल ,आकाश शिरसागर , कृष्णा अडगोलू, मल्हारी सुरवसे ,सुरेंद्ररत्न वाघमारे बापू डहाळे दत्ता कावळे, मैत्रे साहेब नरेश सिरसलआधी सह सर्व कर्मचारीवर्ग व प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.