अक्कलकोट(प्रतिनिधी) – स्वामी भक्तीच्या माध्यमातून वटवृक्ष मंदिरात येऊन स्वामींची साधना करीत असताना जो समाधान व जी मनशांती लाभते ती अन्यत्र कोठेही लाभत नाही.
त्यामुळे स्वामी दर्शनाने लाभलेले मनी शांती मनाला भावते असे मनोगत पुणे सी.आय.डी.खात्यातील विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर बोलत होते.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी रानडे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला यावेळी अक्कलकोट नॉर्थ पोलीस स्टेशनचे पीआय कल्लप्पा पुजारी, गोपनीय विभागाचे धनराज शिंदे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, व्यंकटेश पुजारी, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव इत्यादी उपस्थित होते.