ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्व.काशिनाथ भरमशेट्टी यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त १०८ जणांचे रक्तदान,

 

अक्कलकोट, दि.६ : स्वामी समर्थ कारखान्याचे माजी व्हाईस
चेअरमन काशिनाथ भरमशेट्टी यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथे बुधवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले.या शिबिरात १०८ जणांनी रक्तदान केले.या उपक्रमाला हन्नूर आणि परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.के.बी प्रतिष्ठानच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दरवर्षी भरमशेट्टी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जातात.यावर्षी कोरोना संकटात रक्ताची गरज ओळखून या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे आयोजक विश्वनाथ भरमशेट्टी यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक उमेश पाटील होते.व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे,माजी उपसभापती सिध्दार्थ गायकवाड,संयोजक विश्वनाथ भरमशेट्टी, डाॅ.नेहा भरमशेट्टी,क्रांती दर्गोपाटील,युवा नेते राजकुमार भरमशेट्टी,धानप्पा हंडगे,हमीद पिरजादे,बसवराज बाणेगांव,
सिद्धाराम भंडारकवठे, मुलुकसो सगरी,दिलीप बिराजदार,महेश पाटील,दिलीप काजळे,राजशेखर मसुती,अबुजर पटेल आदी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भरमशेट्टी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर रक्तदान शिबीराला सुरूवात करण्यात आली. भरमशेट्टी यांनी संपूर्ण आयुष्यात राजकारण केले.मात्र राजकारणातुन त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी झटण्याचा ध्यास घेतला होता.अशी माणसे दुर्मिळ आहेत.समाजाच्या उन्नतीसाठी अशा माणसांची गरज असते पण ते आज दुर्दैवाने आपल्यात नाहीत त्याची आज खंत वाटते,असे उमेश पाटील यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब मोरे,वैभव भरमशेट्टी यांनी मनोगत व्यक्त करताना काशिनाथ भरमशेट्टी यांच्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी प्रत्येक रक्तदात्यांना के.बी.प्रतिष्ठानकडून भेटवस्तु देण्यात आले. या शिबिरासाठी सिद्धेश्वर ब्लड बँक आणि अश्विनी ब्लड बँक यांचेही सहकार्य लाभले.

या शिबीराला जयहिंद शुगर्सचे बब्रुवान माने – देशमुख,बाबू कराळे,बाळासाहेब जगताप, प्रा.निलेश भरमशेट्टी,चंद्रकांत जंगले गुरूजी,,नरेंद्र जंगले,चंद्रकांत रोट्टे,चंद्रकांत सैदे,अप्पाशा हताळे,बसवणप्पा सुतार,विठ्ठल मोकाशी,गोटू मंगरूळे,विश्वनाथ भोसले,ईरण्णा पारतनाळे,शैलेश पाटील,चंदू कस्तुरे,प्रकाश बिराजदार,पकु बुगडे,औदूंबर जाधव,मलप्पा भरमशेट्टी,विठ्ठल भरमशेट्टी,योगीराज भरमशेट्टी,चंद्रमणी बाळशंकर,कपिल बंदिछोडे,निलप्पा घोडके,एन.पी.पाटील,लक्ष्मण बिडवे,तिपण्णा हेगडे,विश्वनाथ
भरमशेट्टी, सिध्दाराम मड्डी यांनी हजेरी लावली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल बिडवे,विश्वनाथ बिराजदार,निरंजन हेगडे,शिवा गवळी,सिध्दप्पा पुजारी,परशुराम बाळशंकर,त्रिमुख बाळशंकर,लायकअली नदाफ,गौरीशंकर भरमशेट्टी,शिवप्पा फसगे,मनोज भरमशेट्टी,सायबण्णा सुतार,योगीराज भरमशेट्टी, प्रदिप भरमशेट्टी,रमेश छत्रे,महादेव बंदिछोडे,सिध्दाराम भरमशेट्टी, अप्पू पारतनाळे, सिध्दाराम हेगडे,मिलन भरमशेट्टी, सिध्दाराम बकरे,भिमा सुतार,विश्वनाथ भोसले,बसवराज हेगडे आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल भरमशेट्टी यांनी तर आभार वैभव भरमशेट्टी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!