---Advertisement---

अक्कलकोट नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या निवडी जाहीर

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.६ : अक्कलकोट
नगरपरिषदेच्या यावर्षीच्या विविध विषय समित्यांच्या निवडी बुधवारी पार पडल्या. यामध्ये सहा समित्यांपैकी पाच भाजप तर एक समिती काँग्रेसला देण्यात आली.या
निवडी बिनविरोध करण्यात आल्या. पीठासन अधिकारी तथा तहसीलदार अंजली मरोड यांनी याची घोषणा केली.
ही सर्व प्रक्रिया मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.यामध्ये
पाणी पुरवठा समिती सभापती म्हणून अरुणा पवार त्यात एकूण सहा सदस्य निवडण्यात आले.बांधकाम समिती सभापती म्हणून सद्दाम शेरीकर यांची वर्णी लागली गेली.यात एकूण सहा सदस्य आहेत.महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून पूजा राठोड यांची निवड करण्यात आली.
यात आठ सदस्य आहेत .स्वच्छता, वैद्यक आरोग्य समिती सभापतीपदी अश्विनी मोरे असून त्यात एकूण सहा सदस्य निवडण्यात आले .नियोजन व विकास समिती सभापती म्हणून उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे यांची निवड करण्यात आली यातही एकूण सहा सदस्य निवडण्यात आले आहेत. स्थायी समिती सभापतीपदी म्हणून नगराध्यक्षा शोभा खेडगी यांचीच निवड करण्यात आली.या समितीमध्ये नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी ,महेश हिंडोळे,अशपाक बलोरगी यांचा यात समावेश करण्यात आला आहे.या समितीमध्ये एकूण नऊ सदस्य आहेत.यासाठी सकाळी ११ ते १ या वेळेत नामनिर्देशन पत्र भरण्यात आले.दुपारी
१ ते २ छाननी आणि सदस्य निवड करणे,२ वाजता सभापती अर्ज भरणे व त्यानंतर सभापती निवडी जाहीर करण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या निवडी पार पडल्या. निवडी प्रसंगी सर्व नगरसेवक
उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!