स्व.सर्जेराव जाधव यांचे कार्य दिपस्तंभाप्रमाणे : फडतरे; अक्कलकोटमध्ये जाधव यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
अक्कलकोट,दि.२६ : थोर समाजसेवक प्रसिद्ध सरकारी वकील स्व.सर्जेराव जाधव हे समाजातील दिपस्तंभ होते.
त्यांचा कारभार स्वच्छ होता.त्यांनी घालुन दिलेल्या मार्गावरूनच आमच्या ट्रस्टची वाटचाल सुरु आहे, असे प्रतिपादन संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सुरेश फडतरे यांनी केले. सर्जेराव जाधव सभागृहात त्यांची १०१ वी जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबा निंबाळकर होते. स्व.सर्जेराव जाधव यांनी आपली आयुष्य भराची कमाई समाजसेवेसाठी दिली आहे त्यांचे कार्य अविरतपणे मृत्यूनंतर देखील सुरू आहे त्यांचा आदर्श घेण्यासारखे आहे,असेही फडतरे म्हणाले.अध्यक्षपदावरून बोलताना निंबाळकर म्हणाले स्व.सर्जेराव जाधव यांनी गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, शेतकऱ्यांना बी बियाणे, गरजूंना वैद्यकीय आर्थिक मदत, निराधार व्यक्तीच्या अंत्यसंस्कारास आर्थिक मदत याची सोय ट्रस्ट मधुन केलेली आहे. प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शरद फुटाणे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन विश्वस्त मोहन चव्हाण व अन्य सदस्यांनी केले. याप्रसंगी संतोष जाधव, सुरेश सुर्यवंशी, गफुर शेरीकर, अरुण जाधव ,अरविंद कोकाटे, सुरेश फुटाणे, सुभाष गडसिंग, दत्ता पाटील, सोपान गोंडाळ, सुधाकर गोंडाळ, प्रकाश पडवळकर, आत्माराम घाडगे, दिगंबर डांगे, शितल फुटाणे, राजु भोसले, सुर्याजी पाटील, शुक्राचार्य चव्हाण व प्रशालेचे शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.