अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथे मुख्यकार्यकारी यांच्या आदेशानुसार माझे गाव कोरोना मुक्त गाव, राष्ट्रीय मतदार दिन व पाचवी ते सातवी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी गावातील प्रमुख मार्गावरुन जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, आश्रम शाळा शिक्षक व अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्कर, पोलीस पाटील,सरपंच व प्रतिष्ठीत गावकरी आदींनी संपूर्ण गावातून घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली.या वेळी कोरोना मुक्त गाव झालेच पाहिजे,अठरा वर्षे वरील मतदार नोंदणी झालीच पाहिजे.आदी घोषणा देत आश्रम शाळे पासून प्रभात फेरीला सुरुवात होऊन गोंधळी वस्ती, ग्रामपंचायत कार्यालय, जयभीम नगर आदी प्रमुख मार्गावरून येऊन कट्टेव्वा देवीच्या प्रांगणात प्रभात फेरीचा समोरोप करण्यात आला.
या वेळी मुख्याध्यापक अरुण पोपसभट यांनी प्रास्ताविक करीत प्रभात फेरी आयोजनाचे महत्त्व सांगितले.त्या नंतर कृष्णात मोरे यांनी ‘माझे गाव कोरोना मुक्त गाव’ अभियान विषयी सविस्तर माहिती दिली.तर मल्लय्या हिरेमठ व सचिन नारायणकर यांनी राष्ट्रीय मतदार दिना विषयी माहिती देऊन जनजागृती करण्याचे काम केले. त्या नंतर सचिन नारायणकर व कृष्णात मोरे यांनी माझे गाव कोरोना मुक्त गाव व राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून प्रतिज्ञा सादर केली. तेव्हा सर्व कर्मचारी बांधव व प्रतिष्ठीत गावकर्यांनी ही प्रतिज्ञा केली.शेवटी गावचे ग्रामविकास अधिकारी भीमराव गुरव यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करीत कार्यक्रमाचे समारोप करण्यात आला. या वेळी उमेश पाटील, अंबण्णा कोळी, मोसीन मुल्ला,कट्टेप्पा कोळी,पोलीस पाटील मोहन वाघमोडे,शिवप्पा कोळी,काशिनाथ मिसे,महंमद शेख, जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षक व शिक्षिका,आश्रम शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,व प्रतिष्ठीत गावकरी आदी उपस्थित होते.