ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हन्नूर ग्रामपंचायतीवर आ.कल्याणशेट्टी व भरमशेट्टी गटाचे वर्चस्व

 

 

अक्कलकोट, दि.२० : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या हन्नूर ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि विश्वनाथ भरमशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले.या निवडणुकीत सर्वच्या सर्व अकरा जागा जिंकून विरोधकांचा सुपडा साफ केला.निवडणूक लागण्यापूर्वी ही निवडणूक दोघांकडून बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु काही जणांनी ही निवडणूक लावण्याचा प्रयत्न केला.तरीही ज्येष्ठ नेते सिद्धप्पा कल्याणशेट्टी,सागर कल्याणशेट्टी,विश्वनाथ भरमशेट्टी व राजकुमार भरमशेट्टी यांनी एकत्र येत पॅनल उभा करून गावावर वर्चस्व प्राप्त केले.चार जागा यापूर्वीच दोन्ही गटाच्या बिनविरोध झाल्या होत्या.उर्वरित सात जागांसाठी निवडणूक लागली होती. यामध्येही कल्याणशेट्टी आणि भरमशेट्टी गटाचे उमेदवार विजयी झाले.प्रभाग १ मध्ये सोपान निकते,प्रभाग २ मध्ये शैलेश पाटील,सोनाबाई तळवार, प्रभाग ४ मध्ये युवा नेते सागर सिद्धप्पा कल्याणशेट्टी हे यापूर्वीच बिनविरोध झाले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत प्रभाग १ मध्ये श्रीकांत बकरे हे ३०१ मते घेऊन विजयी झाले. प्रभाग २ मध्ये गौराबाई भरमशेट्टी हे ३९३ मते घेऊन विजयी झाले. प्रभाग ३ मध्ये गौतम बाळशंकर यांनी ३१४ मते मिळवून विजयी झाले. प्रभाग ३ मध्येच नीता सोनकांबळे ३४६, जयश्री भरमशेट्टी यांनी ३१६ मते घेऊन विजय मिळवला. प्रभात ४ मध्ये काशप्‍पा पुजारी यांनी ३३० आणि शांताबाई फसगे ह्या ३६६ मते घेऊन विरोधी उमेदवाराचा पराभव केला.सर्वच्या सर्व उमेदवार हे चांगल्या मतांनी विजयी झाले.

विरोधी चंद्रमणी बाळशंकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही.यावरून जेष्ठ नेते सिद्धप्पा कल्याणशेट्टी आणि विश्वनाथ भरमशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची ताकद गावात दिसून आली.मागच्या पंचवार्षिक निवडणुकीतही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलनेच माजी बाजी मारली होती.दोन्ही गट आता एकत्र आल्याने गावच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

कल्ल्याणशेट्टी आणि
भरमशेट्टी एकत्र

उत्तर भागात हन्नूर गावच्या राजकारणाला मोठे महत्त्व आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे हे गाव आहे.
त्यामुळे याठिकाणी काय होणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले होते.परंतु या निवडणुकीत कल्याणशेट्टी आणि भरमशेट्टी गटच यांनी एकत्र येऊन गावात वर्चस्व प्रस्थापित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!