केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री पदाची सूत्रे स्वीकारताच रावसाहेब दानवे यांनी केली मुंबईलोकल संदर्भात मोठी घोषणा
दिल्ली : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्रीपदाची सूत्र स्विकारताच मुंबई लोकल संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकारनं लोकल सुरू करण्याची विनंती केली, तर केंद्र सरकार लगेच मुंबई लोकल सुरू करेल, असे आश्वासन रावसाहेब दानवे पतील यांनी पदभार स्वीकारताना दिलं आहे.
राज्याने अभ्यास करुन यासंदर्भात प्रस्ताव पाठवला तर रेल्वे सुरु केली जाईल. केंद्राकडून कोणतीही अडचण येणार नाही’, असं आश्वासन रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिली.
कोरोनाची स्थिती आटोक्यात आली आहे, असे जेव्हा राज्य सरकारला वाटेल, तेव्हा राज्याने यासंदर्भात प्रस्ताव पाठवला तर त्यावर योग्य आभ्यास करून रेल्वे व्यवस्था सुरळीत करण्यात येईल असे रावसाहेब दानवे म्हणाले.
राज्य सरकारने विनंती केल्यास तातडीने लोकल सेवा सुरु करु असे देखील दानवे म्हणाले.