मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप केले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नाना पटोले यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहेत.तर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येतो हे पहावं लागणार आहे.
नाना पटोले यांच्या आरोपांवर नवाब मलिक म्हणाले की, नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा केलेला आरोप हा माहितीअभावी आहे, असे नवाब मलिक म्हणाले. नाना पटोले यांनी यासंदर्भात त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेऊन आरोप करावे,असा टोलाही नवाब मलिक यांनी यावेळी लगावला.
सरकार कुणाचेही असले तरी अशा पद्धतीनं माहिती गृह खातं संकलित करत असते. सुरक्षेच्या दृष्टीने मंत्र्यांच्या आणि राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांवर लक्ष ठेवून असते. हे आताच होत आहे असं नाही. सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यासाठी हे प्रत्येक सरकारमध्ये होते. नाना पटोले यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून माहिती घ्यावी असे मंत्री नवाब मलिक म्हणाले.