ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात गर्भवती महिलांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात

सोलापूर, दि.१७ : गर्भवती स्त्रियांचे covid लसीकरण याबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये खूप संभ्रम होता. पण संशोधनाअंती असे लक्षात आले की गरोदरपणात covid होण्यापेक्षा लस घेणे जास्त फायदेशीर ठरते. त्यामुळेच नवीन आदेशानुसार गरोदरपणाच्या सर्व टप्प्यामध्ये covid ची लस घेणे सुरक्षित गणले गेले. यामुळे आईस किंवा बाळास कुठलाही धोका संभावत नाही. लसीनंतर येणाऱ्या तापासाठी paracetamol ची गोळी घेणे सुरक्षित आहे. कुठल्याही स्त्रीस काही विशेष त्रास झाल्यास लगेचच वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे.

सोलापूर महानगर पालिकेने दि 17 जुलै रोजी गर्भवती स्त्रियांच्या लसीकरणाचा शुभारंभ केला. हा उपक्रम राबवणारी सोलापूर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका आहे.
या स्तुत्य उपक्रमाचे इंडियन मेडिकल असोसिएशन व सोलापूर स्त्रीरोग संघटना यांनी महानगरपालिकेचे अभिनंदन केले. तसेच पालकमंत्री श्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

त्यावेळी मनपा च्या आरोग्यअधिकारी डॉ. अरुंधती हराळकर, इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. मिलिंद शहा, सोलापूर स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ. अबोली वेलणकर, सचिवा डॉ. प्राजक्ता शितोळे, इंडियन मेडिकल असोसिएशन च्या सचिवा, डॉ. तन्वंगी जोग, मनपा च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याणी काळे, परिचारिका व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

आज जवळजवळ 100 गर्भवती स्त्रियांनी या लसीकरणाचा लाभ घेतला, व लस घेणाऱ्या कोणत्याही स्त्रीस काही त्रास झाला नाही. त्यामुळे जास्तीत जास्त गर्भवती महिलांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले गेले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!