---Advertisement---

दर्शनाळ येथे बालविवाह थांबवा अभियान उपक्रम

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१७ : अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ येथे एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत बालविवाह थांबवा अभियान दर्शनाळ अंगणवाडी क्रमांक ३ / २२३ व मिनी अंगणवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने बालविवाह थांबवा अभियान राबविण्यात आले.

या अभियानात मुलाचे वय २१ वर्षांच्या पुढे व मुलींचे वय १८ वर्षाच्या पुढे असावे, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय बालविवाहाचे दुष्परिणाम ग्रामस्थांना सांगण्यात आले.

हा कार्यक्रम चपळगाव बीटच्या पर्यवेक्षिका अश्विनी चटमुटगे व पर्यवेक्षिका स्वरांगी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य मल्लिनाथ व्हनमुर्गे, अंगणवाडी सेविका निर्मला तंबाके, सागरबाई बनसोडे, शोभा हांडगे, प्रियांका माने, सुनंदा सपळे,आशा सेविका सुवर्णा सपळे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!