ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राष्ट्रवादी तर्फे जिल्ह्यात २ ऑगस्टपासून नागरीकांचा जनता दरबार, अक्कलकोट येथून होणार शुभारंभ

अककलकोट दि.२५ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री कार्यालय व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांची शासन दरबारी प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्यासाठी ६८ जि.प. मतदारसंघात व ११ नगरपालिका क्षेत्रात  ‘नागरिकांचा जनता दरबार’  जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांच्या संकल्पनेतून दि.२ आणि ३ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित करण्यात आला आहे.याचा शुभारंभ २ ऑगस्ट रोज सकाळी १० : १० वाजता अक्कलकोट येथून होणार आहे.

मैंदर्गी, दुधनी आणि सलगर जिल्हा परिषद गट पहिल्या दिवशी होणार आहे. ३ ऑगस्ट रोजी चपळगाव, वागदरी, जेऊर, नागणसूर  आणि तडवळ जिल्हा परिषद गटात उमेश पाटील यांचा संपर्क दौरा होईल,अशी माहिती तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे व शहराध्यक्ष मनोज निकम यांनी दिली.

या मेळाव्यात तीन नगरपालिका क्षेत्रासह सहा जिल्हा परिषद मतदारसंघात येत असलेल्या विविध अडचणींबाबत ग्रामस्थांनी निवेदन सादर करावयाची आहेत.याबद्दल सविस्तर असा आराखडा राष्ट्रवादीतर्फे तयार करण्यात येत असून या दौऱ्याच्या माध्यमातून तो थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोचवण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील नागरिकांनी या संपर्क दौऱ्यातून तालुक्यातील प्रश्न व समस्या मांडाव्यात, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

यावेळी तालुक्‍यात दोन दिवस होत असलेल्या या संपर्क दौऱ्याचे नियोजन आणि चर्चा या बैठकीत करून जबाबदारी निश्चित करण्यात आली.

याप्रसंगी सिद्धाराम पोतदार, शंकर व्हनमाने, प्रा.प्रकाश सुरवसे, शिवराज स्वामी,अविराज सिद्धे, आकाश कलशेट्टी, विक्रांत पिसे, शंकर पाटील, राम जाधव, स्वामीनाथ पोतदार, इस्माईल फुलारी, फरीद जमादार, ज्ञानेश्वर बनसोडे, श्रीनिवास सिंदगीकर, सिंकदर चाऊस, मोतीराम चव्हाण, राहुल किरनळळी, श्रीशैल चितली यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माणिक
बिराजदार यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!