सत्ता असो किंवा नसो सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सदैव कटिबद्ध: पाटील, राष्ट्रवादीच्या जनता दरबार कार्यक्रमास अक्कलकोट येथून प्रारंभ
अक्कलकोट, दि.२ : राष्ट्रवादी हा पक्ष सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवणारा आहे. सरकार आमचे असले तरी जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.सत्ता असो किंवा नसो आम्ही जनतेच्या कामासाठी सदैव कटिबद्ध असतो, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या जनता दरबार कार्यक्रमाचे उद्घाटन प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांच्या हस्ते अक्कलकोट येथे करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे हे होते. राष्ट्रवादीने हा उपक्रम आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश वेगळा आहे. सत्ता येत असते जात असते पण नागरिकांच्या अडचणी सोडवणे फार महत्त्वाचे असते.
तहसील, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय यासंबंधी लोकांचे खूप तक्रारी आहेत जर त्या सुटल्या नाही तर नागरिक सरकारला दोष येतात. पण यात सरकारचा दोष नसतो. मधल्या यंत्रणेचा असतो त्यामुळे ही यंत्रणा सुधारण्यासाठी आणि नागरिकांच्या अडचणी थेट सोडवण्यासाठी हा राष्ट्रवादीचा जनता दरबार आहे.
कार्यक्रम राजकीय वाटत असला तरी लोकांचे प्रश्न सुटावेत हाच उद्देश या पाठीमागे आहे. सर्वसामान्य
माणूस हा जिल्हाधिकारी किंवा अन्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत नसतो पण आम्ही हे स्वीकारलेले अर्ज आणि निवेदन हे थेट उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण नक्की होणार आहे. यातून सामान्य नागरिकांचा राष्ट्रवादी पक्षावरचा विश्वास वाढेल. या जनता दरबार मध्ये आलेल्या प्रत्येक अडचणीवर विचार करून त्या त्या विभागामार्फत ती कामे पूर्ण केली जातील आणि त्याचा पाठपुरावा आम्ही स्वतः करू, असे ते म्हणाले.
नागरीकांचा जनता दरबार ही एक नवीन संकल्पना आहे यातून नागरिकांच्या थेट अडचणी समोर येतील आणि लोकांचे समाधान होईल, असे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी सांगितले. दर महिन्याला यापुढे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून बैठक घेऊन तालुक्याच्या ठिकाणी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न होईल.
आगामी निवडणुकांच्या दृष्टीने तालुक्यात राष्ट्रवादीचा पक्ष वाढवण्यासाठी या उपक्रमाची मदत होईल.जिल्हा परिषद पंचायत समिती,नगर परिषद निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी पक्षाची ताकद त्यामाध्यमातून वाढवावी, असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर, कल्याणराव काळे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून या उपक्रमाचा फायदा जनतेने करून घ्यावा, असे आवाहन केले.
व्यासपीठावर सोलापूर शहराध्यक्ष भारत जाधव, युवा नेते संतोष पवार, उत्तमराव जानकर, कल्याणराव काळे, लतीफभाई तांबोळी, राजेंद्र हजारे, मानाजी बापू माने, हनुमंत पवार, अभिषेक आव्हाड, सुहास कदम, धनंजय साठे, नागेश काटे यांच्यासह कार्यक्रमाचे संयोजक तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, शहराध्यक्ष मनोज निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर व्हनमाने यांनी केले.
प्रास्ताविक कार्याध्यक्ष माणिक बिराजदार यांनी केले. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार शिवराज स्वामी यांनी मानले.
यावेळी अविराज सिद्धे, यतीराज सिद्धे, योगीराज सिद्धे, स्वामींनाथ पोतदार, बंदनवाज कोरबू, सुनंदा राजेगावकर, बंटी पाटील, मीरा बुद्रुक, माया जाधव, विक्रांत पिसे, आकाश शिंदे, आकाश कलशेट्टी,
प्रथमेश पवार, सिद्धाराम पोतदार,
श्रीनिवास सिंदगीकर, मोतीराम चव्हाण, राम जाधव, रुद्रय्या स्वामी, सिकंदर चौउस, सिद्धाराम जाधव, सलीम यळसंगी, नवनीत राठोड, अप्पाशा लच्चाण, विशाल राठोड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.