ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबारला दुधनीत उत्तम प्रतिसाद

दुधनी दि. ०२ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री कार्यालय व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांची शासन दरबारी प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्यासाठी ६८ जि. प. मतदारसंघात व ११ नगरपालिका क्षेत्रात ‘नागरिकांचा जनता दरबार’ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांच्या संकल्पनेतून आज दि.२ ऑगस्ट २०२१ रोजी दुधनी येथे पहिल्या टप्यातील जनता दरबार आयोजित करण्यात आले होते. यास दुधनी, सिन्नुर आणि परिसरातील नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

यावेळी दुधनी शहरातील बहुतांश नागरिकांनी रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र आणि इतर समस्या बद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांच्याकडे निवेदन सादर केली, या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक आयोजीत करुन आपला प्रश्नमार्गी लावुन आपल्या समस्या सोडवण्यात येईल, असे आश्वसन उमेश पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी जिल्हा सरचिटणीस लतीफ तांबोळी, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिषेक आव्हाड, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख मिलिंद गोरे, जिल्हा संघटक विक्रांत पिसे, ता लुका अध्यक्ष दिलीप भाऊ सिद्दे, अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे, अक्कलकोट शहराध्यक्ष मनोज निकम, तालुका कार्याध्यक्ष माणिक बिराजदार, तालुका उपाध्यक्ष शिवराज स्वामी, तालुका सरचिटणीस शंकर व्हनमाने, तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी पाटील, जिल्हा महिला संघटक सुनंदा राजेगावकर, महिला अध्यक्षा माया जाधव, महिला उपाध्यक्ष बुद्रुक मॅडम, युवा नेते अविराज सिद्दे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!