ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोना संकटात रुग्णवाहिकेमुळे नागरिकांचा जीव वाचेल, अक्कलकोट येथे खासदार निधीतून मिळाली रुग्णवाहिका

अक्कलकोट,दि.२ : कोरोना महामारीमध्ये जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्याचा विचार करून रुग्णवाहिकेची सोय केली आहे, त्याचा लाभ गरजू रुग्णांना नक्की होईल आणि त्यांचा जीव वाचेल, असे प्रतिपादन खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले.

सोमवारी,अक्कलकोट येथे ३० लाख रुपये खर्चून खासदार निधीतून सुसज्ज रुग्णवाहिका देण्यात आली. त्याचा लोकार्पण सोहळा नगरपरिषदेत त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शोभा खेडगी होत्या. कोरोना महामारी संकटाचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारला करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी यांनी केले.

अक्कलकोट शहराला चांगल्या भूयारी गटार योजनेची गरज आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ त्याच्या निर्मितीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन केले.सध्याचा काळ अडचणींचा आहे. कोरोनासारखे महाभयंकर संकट देशासमोर आहे. हे संकट कमी करण्यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारणीला प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच नगरपालिकेने सौरऊर्जा प्रकल्प राबवावा त्यास निश्चित सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.

याप्रसंगी नगराध्यक्षा शोभा खेडगी, माजी नगरसेवक उत्तम गायकवाड, मल्लिनाथ स्वामी, शिवा संघटनेचे मल्लिनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला तहसीलदार अंजली मरोड, मुख्याधिकारी सचिन पाटील, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी, मिलन कल्याणशेट्टी, बंटी राठोड , सुनील बंडगर, सद्दाम शेरीकर, आलम कोरबु, कांतू धनशेट्टी,नागु कुंभार, दीपक जरीपटके ,जितेश यारोळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!