ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ऑलिम्पिक 2020! चक दे इंडिया, हॉकीत ४१ वर्षानंतर भारताने जिंकले ब्रॉंझ पदक, जर्मनीवर दणदणीत विजय

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारती पुरुष हॉकी संघाने इतिहास घडवत तब्बल 41 वर्षापसुनचा पदकाचा दुष्काळ अखेर संपवला आहे. कास्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने 5-4 अशा फरकाने जिंकला. भारताने जर्मनीचा पराभव करून देशाला ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे. याआधी भारताने मॉस्को ऑलिम्पिकमध्ये १९८० साली अखेरचे पदक जिंकले होते.

भारतीय हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर या विजयातील सर्व खेळाडुंवर सर्वस्थरातुन कौतुकांचा वर्षाव होत आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन अभिनंदन केली आहे.

जर्मन संघाने सामन्याच्या पहिल्या मिनिटातच गोल करत आघाडी मिळवली. पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीचा संघ वरचढ ठरला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने शानदार वापसी केली. 17व्या मिनिटाला सिमरनजीत सिंह याने गोल करत 1-1 अशी बरोबरी साधून दिली. यानंतर जर्मनीच्या वेलेन याने एक गोल करत जर्मनीला 2-1 ने आघाडीवर नेलं. त्यानंतर पुढील मिनिटाला आणखी एक गोल जर्मनीने 3-1 ने आघाडी घेतली. तेव्हा भारतीय हार्दिक सिंगने 27व्या तर हरमनप्रीत सिंग याने 29व्या मिनिटाला गोल करत सामना 3-3 ने बरोबरीत आणला.

या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ऐतिहासिक! असा दिवस जो प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात कोरला जाईल. कांस्य जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. या पराक्रमाने त्यांनी संपूर्ण राष्ट्राची, विशेषत: आपल्या तरुणांची कल्पनाशक्ती काबीज केली आहे. भारताला आमच्या हॉकी संघाचा अभिमान आहे. अस ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहेत.

 

तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये सुरुवातीलाच रुपिंदर पाल सिंहने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करून भारताला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सिमरनजीतने भारतासाठी आणखी एक गोल करून ५-३ अशी आघाडी केली. तिसऱ्या क्वॉर्टरचा खेळ संपला तेव्हा भारताने आघाडी कायम ठेवली होती. चौथ्या क्वॉर्टरमध्ये भारताने आघाडी कामय ठेवली. अखेरच्या ४ मिनिटात जर्मनीने गोलकीपरला बाहेर केले आणि गोल करण्याचे प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही. शेवटच्या मिनिटाला देखील जर्मनीला गोल करण्याची संधी होती. पण भारताने त्याचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाही आणि ऐतिहासिक असे पदक जिंकून दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!