अक्कलकोट: अक्कलकोट शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण सापडत असून पालिकेने खबरदारी घेऊन उपाय योजना करावी, अशी मागणी अक्कलकोट शहर एमआयएमम पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमचे शहराध्यक्ष इरफान दावणा यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.
अक्कलकोट शहरातील डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी रस्त्यावर साचलेले पाणी, फॉगिंग किट आणि गटार, तलावातील कचरा स्वच्छ केले जावे.त्यामुळे डेंग्यूचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत: अक्कलकोट शहरामध्ये चांगला पाऊस पडला आहे आणि जागोजागी या
पाण्याचे खड्डे निर्माण झालेले आहेत. तसेच शहरातील दवाखान्यात डेंग्यू व डेंग्यू सदृश्य रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे डेंग्यूचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत नसल्यामुळे नागरिक पिण्याचे पाणी बॅरल मध्ये किंवा भांड्यामध्ये आठ-आठ दिवस ठेवतात आणि अशा भांड्यामध्ये किंवा बॅरल मध्ये डेंग्यूची डास निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी शहरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन पाण्याची तपासणी करणे गरजेचे आहे. डेंग्यू हा जीवघेणा आजार असल्यामुळे अतिशय तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना घरोघरी जाऊन पाण्याची तपासणी व किटकनाशक फवारणी करण्याचे आदेश द्यावेत,अशी मागणी करण्यात आली आहे. जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पक्षातर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष अतिक बागवान, शहराध्यक्ष इरफान दावण्णा, तालुका युवा अध्यक्ष सैपन हगलदिवटे, शहर यूवा अध्यक्ष सैपन शेख, शहर खजिनदार सैफन निटोरे , मोहसिन बागवान , शहर सचिव अकिब बागवान, शहर कार्याध्यक्ष मोहम्मद शिकलगार, शहर युवा उपाध्यक्ष मोहसिन शेख व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.