मारुती बावडे
अक्कलकोट : अक्कलकोट ग्रामीण रूग्णालयात सिझेरियन सेक्शनची सुविधा नसल्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीबांना खाजगी रुग्णालयात मोठी रक्कम मोजुन सिझेरियन करावा लागत होता. गरीब गरजू कुंटूबांना आर्थिक झळ पोहचू नये म्हणुन वैदकीय अधीक्षक डॉ.अशोक राठोड यांनी ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन सेक्शन सुरुवात करण्याची मागणी केली होती.त्यांच्या मागणीप्रमाणे अखेर ग्रामीण रूग्णालयात सिझेरियन सेक्शनला सुरवात झाली आहे. डॉक्टरांचे मनोबल वाढविण्यासाठी मी स्वत: सिझेरियन केल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले यांनी सांगितले.
अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात आज सिझेरियन सेक्सना सुरवात करण्यात आली आहे. डॉ. प्रदीप ढेले यांनी स्वतः आणि वैदकीय अधीक्षक डॉ.अशोक राठोड, डॉ. शिवणगी यावेळी एक महिलेची सिझेरियन केले.
या वेळी बोलतांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले म्हणाले की,अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात मोफत सिझेरियन करण्यात येत असून ग्रामीण भागातील गरजू महिलांनी सिझेरियनचे लाभ घेण्याचे आवाहन केले.एका महिन्यात पाच सिझेरियन होण्याची अपेक्षा आहे. डॉ.अशोक राठोड यांच्या प्रयत्नाने आता पर्यंत २४ सिझेरियन झाले आहेत. तसेच काही दिवसात अक्कलकोटला ट्रामा केअर सेंटर सुरु होईल, या ट्रामा केअर सेंटरमध्ये अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
कोरोनाची लढाई लढत असताना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी जनतेला उत्तम सेवा देण्याचे कार्य केले आहे. आता डॉक्टर व त्यांच्या सहकार्यांना नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे डाॅ प्रदीप ढेले यांनी सांगितले.
यावेळी डॉ. दीपक पाटील, डॉ. रोहन वायचळ,सिस्टर ग्रेस काकडे, सुरेखा वर्दे, सिस्टर श्रीमती नंदे, दर्शना क्षीरसागर, दुधनीकर, सिस्टर गोटाळे, सिस्टर अल्लापुरे आदी उपस्थित होते.