T20 विश्वचषक क्रिकेटसाठी भारतीय संघाची घोषणा, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या खांद्यावर मोठी जवाबदारी
दिल्ली : बीसीसीआयने टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कमबॅक झाली आहे. बीसीसीआयने महेंद्रसिंग धोनीच्या खांद्यावर मोठी जवाबदारी सोपवली आहे. महेंद्रसिंग धोनी भारतीय क्रिकेट संघाचा मार्गदर्शक म्हणून काम करताना दिसणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही माहिती दिली आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आयसीसी T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.१७ आक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत युएईच्या मैदानात टी20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे.
ही स्पर्धा भारताऐवजी युएई आणि ओमानमध्ये होणार आहे. बीसीसीआयने बुधवारी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील पंधरा सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
नेहमी मैदानात शांत डोक्याने रणनिती आखणारा महेंद्रसिंग धोनी आता मैदानाबाहेरुन भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे धोनीच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट संघ कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
★ टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या खेळाडूंची नावे खालील प्रमाणे
● विराट कोहली (कर्णधार)
● रोहित शर्मा (उपकर्णधार)
● केएल राहुल
● सूर्यकुमार यादव
● रिषभ पंत (विकेटकीपर)
● इशान किशन (विकेटकीपर)
● हार्दिक पंड्या
● रवींद्र जाडेजा
● राहुल चाहर
● रविचंद्रन अश्विन
● अक्षर पटेल
● वरुण चक्रवर्ती
● जसप्रीत बुमराह
● भुवनेश्वर कुमार
● मोहम्मद शमी
★ राखीव खेळाडू :
● श्रेयस अय्यर
● शार्दुल ठाकूर
● दीपक चाहर