---Advertisement---

शिवज्योत घेणाऱ्या तरुणांवर भरधाव कारची धडक; दोघांचा दुर्देवी मृत्यू !

By team
On: March 6, 2026 10:26 AM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शिवजयंतीच्या दिवशी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. विसापूर किल्ल्यावरून पारंपरिक पद्धतीने शिवज्योत घेऊन परतणाऱ्या ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे या दोन तरुणांचा जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भरधाव कारने धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

घटना गुरुवारी मध्यरात्रीनंतर सुमारे दीड वाजताच्या सुमारास घडली. दोघेही आपल्या गाव शिंदेवाडीकडे परतत होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कार अतिशय वेगाने आली होती. चालकाने नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, पण दुभाजक ओलांडताच कार थेट शिवज्योत घेऊन धावत असलेल्या तरुणांवर आदळली.

स्थानिकांनी तातडीने पोलिसांना घटना कळवली. पोलीस घटनास्थळी पोहचले, पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी दोघांबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार, ओंकार आणि दर्शन हे तरुण अत्यंत उत्साही, सामाजिक कार्यात सक्रिय होते. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे शिवजयंतीचा उत्साह क्षणात शोकात बदलला. सोशल मीडियावरही लोकांनी दोघांबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान, राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी केली जात असून पुणे शहरातील मिरवणुका व कार्यक्रमांमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. लक्ष्मी रोड, नेहरू रोड, शिवाजी रस्ता आणि बाजीराव रोड यावर वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचना पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!