राजस्थान : आपात्कालीन परिस्थितीत हायवेचा वापर रनवेत करण्यास सज्ज असणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. भारतीय हवाई दलाच्या सी -130 जे सुपर हर्क्युलस ट्रान्सपोर्ट विमानाने NH-925 राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालीन लँडिंग केले. NH-925 हा भारताचा पहिला राष्ट्रीय महामार्ग आहे. ज्याचा वापर हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी केला जाईल.
युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास देशातील काही महामार्गांचा वापर हा हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ‘रन वे’ म्हणून व्हावा यासाठी ही सोय करण्यात आली आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, हवाईदल प्रमुख आरकेएस भदोरिया आणि संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत उपस्थित होते.
‘सी -130 जे सुपर हर्क्युलस ट्रान्सपोर्ट विमाना’ने राजस्थानच्या जालोर येथील NH-925 राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालीन लँडिंग केले. या संदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
Emergency Landing Facility on Satta-Gandhav stretch of NH-925A near Barmer is being inaugurated. Watch https://t.co/MykNONmJQX
— Rajnath Singh (@rajnathsingh) September 9, 2021