ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेस मैंदर्गी नगर परिषद निवडणूक लढवणार

मैंदर्गी, दि.१४ : अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या माध्यमातुन शहरात झालेल्या विविध विकास कामाच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष निवडणुक लढविणार असल्याची माहीती शहराध्यक्ष निलकंठ मेंथे यांनी दिली.

मैंदर्गी येथील स्थानिक स्वराज संस्था स्थापनेपासुन शहरातील दोन स्थानिक गटातुन निवडणुक लढविली गेले आहे.  या स्थानिक गटात भाजप आणी काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते असल्याने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक झाली नाही.  यापुर्वी माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी पक्षावर निवडणुकीसाठी प्रयत्न केले.  स्थानिक गटातील मतानुसार पक्षावरील निवडणूक रद्द केले. 

राज्यात भाजप सत्ता आल्यानंतर मैंदर्गी नगरपालीकेत भाजप पक्षाने गेल्या निवडणुकीत सतरा जागा लढविली.  यात पक्षाचे चार नगरसेवक निवडुन आले.  सध्या स्थानिक गटातील काँग्रेस पक्षाचे नेते,  कार्यकर्त्यात तीव्र नाराजी होत असल्यामुळे येत्या निवडणुकीत स्थानिक गट व भाजप पक्षाविरुध काँग्रेस पक्ष निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची तयारी सुरु केली आहे.

माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी मैंदर्गी शहरात केलेल्या विविध विकास कामासाठी नगरपालिका सभाग्रह बांधकामासाठी 1 कोटी 25 लाख आणी शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी जुनी पाइपलाइन बदलुन नविन पाइपलाइन तसेच पाण्याची टाकी बांधकाम करण्यात आले आहे.  शहरातील सीटी सर्व्हेची मंजुरी, समाज मंदिर बांधकाम व माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या माध्यमातुन जलशुद्धीकरण केंद्रासाठी 96 लाख तसेच उडगी ते सातनदुधनी डांबरीकरण रस्ता विकासाठी 3 कोटी 50 लाख निधी मिळवुन दिले आहे.

यामुळे शहराच्या विकासासाठी आमदार म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष सतरा जागा लढविणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!