मैंदर्गी : अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर महाराजांची पालखी महोत्सव व धार्मिक कार्यक्रम राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देवस्थानच्या वतीने रद्द करण्यात आल्याची माहीती देवस्थान पंच कमीटीच्यावतीने पत्रकान्वये करण्यात आले आहे.
मैंदर्गी येथील ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात दररोज धार्मिक पुजा आणि पहाटे पाच वाजता होणारी मंगळा आरती श्री’ स पहाटे रुद्रभिषेक आणि पुजा अर्चन करण्यात आली. ग्रामदैवत श्री शिवाचलेश्वर पालखी महोत्सव उत्तरा नक्षत्राच्या पहिल्या गुरुवारी दि. १६ रोजी असून सध्या राज्यात कोरोनाचा पादुर्भाव असल्यामुळे धार्मिक कार्यक्रमावर बंदी आहे म्हणून मंदिर समितीने बैठक घेउन पालखी आणि धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
तरी मंदिरातील धार्मिक कार्यक्रम होणार आहे. तरी भक्तांनी कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी आपपल्या घरीच राहुन देवाचे स्मरण आणि पुजा अर्चन करावे, असे आव्हान देवस्थान पंच कमीटीने केले आहे.