सातलींगप्पा म्हेत्रे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाची अक्कलकोटमध्ये तयारी, २ ऑक्टोबरला तालुक्यात कार्यक्रम
अक्कलकोट, दि.२१ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा दुधनी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष कै.सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त
दुधनीत होणाऱ्या भव्य कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात अक्कलकोट येथील काँग्रेस कार्यालयात बैठक पार पडली. २ ऑक्टोबर रोजी कार्यक्रम पार पडतील. या बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन झाले असून त्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. यानिमित्ताने कै.सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा भव्य पुर्णाकृती पुतळा अनावरण, रक्तदान शिबीर, कोरोना योद्धांचा सन्मान,जीवन चरित्र प्रकाशन, कोरोना लसीकरण इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यासह अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील तसेच कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यासह आळंद अफजलपूर तालुक्यातील सर्व म्हेत्रे प्रेमी, काँग्रेस कार्यकर्ते व युवकांनी उपस्थित राहून रक्तदानासारख्या पवित्र कार्यात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी केले.
या बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी, डॉ.उदयकुमार म्हेत्रे, अक्कलकोट तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहराध्यक्ष मुबारक कोरबू यांनीही युवकांना रक्तदान कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी महिला शहराध्यक्ष सुनिता हडलगी, नगरसेवक विकास मोरे, चंदन आडवितोटे, सद्दाम शेरीकर, रमेश स्वामी, सुनिल खवळे, धर्मराज गुंजले, राहूल मोरे, वशीम कुरेशी, शबाब शेख, मुस्तफा बळोरगी, बसवराज अळ्ळोळी, राजू पाटोळे, जगदीश हळगोदे, सुनिल इसापूरे, रुद्रय्या स्वामी, सरफराज शेख, राहूल भकरे, महादेव चुंगी, फारुक बबर्ची, सिध्दू म्हेत्रे, अभिजीत आडवितोटे, विकी कोरे यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.