ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिक्षक समितीच्या अक्कलकोट तालुकाध्यक्षपदी अजगोंडे यांची निवड

अक्कलकोट ,दि.४ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या अक्कलकोट तालुकाध्यक्षपदी जेऊरचे शिक्षक समितीचे नेते शंकर अजगोंडे यांची एकमताने निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पतसंस्थेच्या अक्कलकोट येथील सभागृहात कार्यकारिणी बैठकीत ही निवड करण्यात आली.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संपर्कप्रमुख सुरेश पवार,पुणे विभागीय अध्यक्ष दयानंद कवडे,पुणे विभागीय संघटक दत्तात्रय पोतदार,जिल्हा सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी,जिल्हा कोषाध्यक्ष रमेश खारे, चंद्रकांत पवार, राजशेखर उंबराणीकर आदी उपस्थितीत होते .

यावेळी सिद्धाराम बिराजदार यांनी नूतन तालुकाध्यक्षपदी अजगोंडे यांच्या नावाची सूचना मांडली.त्यास संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या गजरात अनुमोदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांच्या हस्ते आजगोंडे यांना तालुकाध्यक्ष निवडीचे पत्र देऊन शाल,फेटा आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.अजगोंडे यांच्या रुपाने अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक समितीने धडाडीच्या कार्यकर्त्याला संधी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

याप्रसंगी अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न अधिक जोमाने सोडविण्यासाठी संघर्षरत राहून कामकाज करणार असल्याचा मनोदय नूतन तालुकाध्यक्ष अजगोंडे यांनी बोलून दाखविला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!