---Advertisement---

कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरणाची कवचकुंडल मोहिम यशस्वी करा : मुख्याधिकारी ;अन्नछञ मंडळात कोरोना लसीकरण

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट,दि.१२ : कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरणाची कवचकुंडल मोहिम यशस्वी करा, असे आवाहन मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले होते.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि लायन्स क्लब अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना लसीकरण शिबीराचे आयोजन अन्नछत्र प्रांगणात करण्यात आले. प्रारंभी लायन्स क्लब अध्यक्ष शिरीष पंडित यांनी स्वागत प्रास्ताविक केले तर सचिव विठ्ठल तेली यांनी शिबिर आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली.

या कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विन करजखेडे, डॉ.गजानन मारकड. डॉ.कांबळे, डॉ गोरे आणि ग्रामीण रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते. डॉ. अश्विन करजखेडे यांनी कोरोनाने झालेले मृत्यू पाहता आणि कोरोना रूग्ण संख्या मोठी होती. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधान रहावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाला अन्नछत्र उपाध्यक्ष अभय खोबरे शाम मोरे डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ प्रदीप घिवारे, सचिव शाम मोरे, लायन्स ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र हत्ते, उपाध्यक्ष सुभाष गडसिंग,  सुधीर माळशेट्टी, प्रभाकर मजगे,  मल्लिनाथ साखरे,  मल्लिनाथ मसुती, प्रकाश उण्णद,  नगरसेवक जितेंद्र यारोळे, मलिक बागवान माळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाबासाहेब निंबाळकर यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!