वटवृक्ष मंदिरात रविवारी नेत्र तपासणी शिबीर, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व पुण्यातील बुधराणी हॉस्पीटल यांचा संयुक्त उपक्रम
अक्कलकोट, दि. १४/१०/२०२१ – श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती व कोरेगाव पार्क पुण्यातील बुधराणी हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
रविवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२१ रोजी येथील श्री वटवृक्ष मंदिरात सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत हे शिबीर आयोजित केले असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.
याप्रसंगी बोलताना इंगळे यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने वेळोवेळी धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांसोबत आरोग्य विषयकही विविध शिबिरांचे उपक्रम राबविले जातात. त्या माध्यमातूनच आता मंदिर समितीच्या वतीने आम्ही हे मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले आहे. महाराष्ट्र राज्य पीपल्स डेव्हलपमेंट फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव काकडे यांच्या अधिपत्याखाली हे शिबीर संपन्न होणार आहे.
या शिबिरात रुग्णांच्या डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांची मोफत तपासणी केली जाईल. या शिबिरातून ज्या रूग्णांना मोतीबिंदू अथवा डोळ्यांच्या इतर आजारांविषयी शस्त्रक्रियेची गरज भासेल त्यांच्या डोळ्यांची मोफत शस्त्रक्रीयाही (ऑपरेशन) पुण्यातील बुधराणी हॉस्पीटल येथे करण्यात येईल, तरी जास्तीत जास्त गरजू नेत्र रुग्णांनी या मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रीया शिबिराचा लाभ घ्यावा व त्याकरिता ज्ञानदेव काकडे (मो – ८२६१९०४१२२), ज्ञानेश्वर गुरव (मो – ९४२०७२१२३०), प्रशांत (पप्पू) गुरव (मो – ९२७०६०८०११) या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून रुग्णांनी या शिबिरात नाव नोंदणी करावे असे आवाहनही महेश इंगळे यांनी या प्रसंगी केले आहे.
याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, महादेव तेली, विपुल जाधव, अविनाश क्षीरसागर, प्रसाद सोनार इत्यादी उपस्थित होते.