ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वागदरी येथे जिल्हा परिषद निधीतून उर्दू शाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन ;जि. प.आनंद तानवडे यांचे प्रयत्न

अक्कलकोट ,दि.३१ : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन सोहळा जि.प .सदस्य आनंद तानवडे यांच्या हस्ते पार पडला.या बांधकामास जिल्हा परिषद निधीमधून १६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यावेळी पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते गुंडप्पा पोमाजी, केपी गायकवाड प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल गायकवाड, सरपंच श्रीकांत भैरामडगी, उपसरपंच लक्ष्मीबाई पोमाजी व तंटामुक्त अध्यक्ष शांतप्पा कोटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकारी राजेंद्र करमुसे, उर्दू शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच भुरीकवठे, गोगाव, किरनळी, खैराट, बोरगाव सह परिसरातील मुस्लिम बांधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना तानवडे म्हणाले, या शाळेसाठी वॉल कंपाऊंड निधी लवकरात लवकर मिळवून देणार आहे. राहुल गायकवाड यांच्याकडून कॉम्प्युटर संच, गुंडाप्पा पोमाजी यांचेकडून प्रोजेक्टर तसेच सरपंच यांच्याकडून दोन लाख रुपयाचे शैक्षणिक साहित्य देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याठिकाणी उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन पर कार्यक्रम घेण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष घुडूभाई आमटे, मुस्लिम समाज अध्यक्ष इस्राईल नदाफ, इस्माईल जमादार, बाबूलाल जमादार, राज अहमद चितारी ,बशीर बागवान, फिरोज तांबोळी,सैपन कुरेशी, इमाम कासिम बागवान,बाबू कुरेशी, हनीफ कालेका, हनीफ मुल्ला, मैनोदीन जमादार ,सलीम बागवान, हुसेन आमटे,आप्पालाल मुल्ला, रुकुम नदाफ ,रफिक नदाफ, सिकंदर आमटे ,लाडले मशाक बागवान, हुसेन कणमुसे ,आसलम मुल्ला ,बुडन जमादार, नजीर नदाफ पप्पू नगर मुन्ना बलोरगी, अजीम आमटे, महबूब चितारी, अन्वर शेख नबीसाहेब नदाफ यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बेपारी यांनी केले तर आभार नबीसाहेब नदाफ यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!