अक्कलकोट ,दि.३१ : अक्कलकोट
येथील निराधार गरीब महिलांना सखी ग्रुपकडून अक्कलकोट तालुक्यात कोविड काळात कुटुंबातील कर्ता पुरुष दगाविल्याने निराधार तसेच गरीब व होतकरु महिलांना दिवाळी सणानिमित्त भेट देण्यात आली.
हा उपक्रम महिलांना स्वावलंबी तसेच
त्यांचे मनोबल वाढविण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आश्विनी बोराळकर यांनी केले. मल्लमा पसारे यांनी या महिलांना आत्मनिर्भर होऊन निर्भीडपणे जीवन जगण्यासाठीव स्वतः च्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यासाठीचे समुपदेशन केले. हा कार्यक्रम टेनिस कोर्ट हॉल येथे संपन्न झाला.
अक्कलकोट सखी ग्रूप नेहमीच समाजसेवेच्या कार्यात अग्रेसर असतो. यावर्षी दिवाळीच्या सणानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील बणजगोळ, बिंजगेर, मिरजगी, मैंदर्गी, सलगर दोड्याळ, गळोरगी, गोगाव, काझीकणबस साफळा, दुधनी, भुरीकवठे, कोळीबेट, भोसगे, कर्जाळ,कोन्हाली गावातील कोविड काळात निराधार झालेल्या गरीब व होतकरू महिलांना फराळ साहित्य, तेल, उटणे, पणत्या व भाऊबीजेसाठी साडीचोळी आदींचे वितरण करण्यात आले.
सखी ग्रुपच्या या भेटमुळे या महिलांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन एकाकीपणाची भावना दूर झाली. यावेळी सखी ग्रुपच्या अनिता पाटील, मल्लमा पसारे, उषा छत्रे, श्रद्धा मंगरुळे,शितल जिरोळे, रत्नमाला मचाले, वेदिका हर्डीकर, डॉ. दीपमाला आडवितोट, प्रियंका किरनळळी, आशा भगरे,लक्ष्मी आचलेर, रोहिणी फुलारी, रेखा तोरसकर,माधवी धर्मसाले,अश्विनी बोराळकर,वर्षा शिंदे, इत्यादी सदस्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सखी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल जाजू व आभारप्रदर्शन सुवर्णा साखरे यांनी केले.