दुधनी : दिपावली निमित्त येथील शांभवी फौंडेशन आणि एस.एस.एम गृपच्यावतीने माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, अक्कलकोट तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शंकरराव म्हेत्रे यांच्या नेतृत्वात दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितिचे सभापती प्रथमेश म्हेत्रे व शांभवी फौंडेशन संस्थापक अध्यक्षा वैशाली म्हेत्रे यांच्या हस्ते येथील श्री. शांतलिंगेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील आडत दुकनांमध्ये सफाई काम करणार्या २५० महिला, २५० पुरुष हमाल तसेच दुधनी कृ.ऊ.बा. समितिमध्ये काम कारणारे कर्मचारी व दुधनी शहरातील गरिब-गरजु असे जवळपास ६०० कुटुंबाना फराळ, साडी आणि कपडे भेट देण्यात आले.
दिपावली म्हणजे घराघरात साजरा होणारा आनंदोत्सव, लहान-थोर, गरीब-श्रीमंत असा भेद यामध्ये नसतो. मोठ्या उत्साही वातावरणात दिपावली सण साजरी केली जाते. कोरोनाची परिस्थीती बाजुला सारुन हि दिपावली मोठ्या आनंदात साजरी करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाला आहे. दरम्यान दिपावली सणाच्या प्रत्येक दिवसाचा अनन्य साधारन महत्व असत. असा या आनंदपर्वपासुन कोणीही वंचीत राहु नये, याकरीता येथील शांभवी फौंडेशन आणि एस.एस.एम. गृपच्यापुढाकाराने दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितिचे माजी सभापती स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे साहेब यांच्या स्मरणार्थ फराळ आणि कपडे भेट देण्यात आल्यची माहिती दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितिचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुरुवात दुधनी कृ.उ.बा.चे माजी सभापती स्व. सातलींगप्पा म्हेत्रे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले
यावेळी शांभवी फौंडेशनच्या अध्यक्षा वैशाली म्हेत्रे म्हाणाले कि, यंदाची दिवाळी सर्वांसोबत साजरा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगुन आपल्या सेवेसाठी शांभवी फौंडेशन आणि एस.एस.एम. ग्रुप सदैव तत्पर असल्याचे सांगितले. तालुका कॉंग्रेस अध्यक्ष शंकर म्हेत्रे बोलताना म्हणाले कि, मागिल दोन वर्षापासुन जागतिक महामारी कोरोनामुळे कोणी दिपावळी सण साजरी करु शकले नाहीत. यंदाच्यावर्षी कोरोनाचा प्रकोप कमी झाला असुन शासनाकडुन निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे गोर-गरिबांचे दिपावळी गोड व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी आडत व भुसार व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी, दुधनी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष गुरुशांत ढंगे, संतोष जोगदे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी आडत व भुसार व्यापारी असोशिएशनचे उपाध्यक्ष राजशेखर दोशी, शिवानंद माड्याळ, बसवण्णप्पा धल्लु, खजिनदार गिरमल्लप्पा सावळगी, शिवानंद हौदे, अशोक पादी, नगरसेवक चांदसाब हिप्परगी, रामचंद्र गद्दी, संतोष सोळशे, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव स्वामींनाथ स्थावरमठ, संचालक सातलींगप्पा परमशेट्टी, माजी नगरसेवक सिद्धाराम येगदी, शंकर भांजी, बसवराज हौदे, संचालक बाबु कोळी, हमाली माथाडी संघटनेचे अध्यक्ष बन्नप्पा पुजारी, उपाध्यक्ष तिप्पय्या गुत्तेदार, विश्वनाथ म्हेत्रे, बैलागडी संघटनेचे अध्यक्ष शिवप्पा सावळसुर, सुरेश खैराट, नगरसेविका सुनंदा हबशी, नगरसेविका शबाना मोमीन, नगरसेविका सुवर्णा पाटील, नगरसेविका ललिता गद्दी, लक्ष्मी म्हेत्रे, अंजली म्हेत्रे, राजश्री माळगे, महानंदा कोटनूर, प्रियांका चिंचोळी, यांच्यासह इतर नागरिक व कॉंग्रेसपक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुरुशांत उप्पीन यांनी केले, आभार गुरुशांत हबशी यांनी मानले.