परभणी : परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. पक्षांतर्गत राजकारण आणि गटबाजीला कंटाळून जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी बुधवारी आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. बाबाजानी दुर्राणी यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेषतः मारहाणीनंतर बाबाजानी दुर्राणी यांनी हा राजीनामा दिला आहे. त्यामागे नेमके कारण काय? अशी चर्चा आता सुरू आहेत. मंगळवारी राष्ट्रवादीचे रायगडचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश लाड यांनी आपला राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ बाबाजानी दुर्राणी यांनी दिलेला राजीनामा सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
परभणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वी फूट पडल्याचे उघड झाले होते. जिल्हाध्यक्ष आणि आमदार असणारे बाबाजानी दुर्राणी शहरात विनाकारण हस्तक्षेप करतात. नगरसेवकांना काम करू देत नाही, असा आरोप करत महानगराध्यक्ष स्वराज सिंह परिहार यांनी राजीनामा दिला होता. या सार्या प्रकरणावर त्यांनी राजीनामा दिला आहे असे बोलले जात आहे. त्यामुळे त्याचेही जोरदार चर्चा सुरू आहे.
आमदार बाबाजानी दुर्राणी यांना ८ नोव्हेंबर रोजी मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे ते चर्चेत होते. दुर्राणी हे पाथरीतील कबरस्तान परिसरात समर्थकांसह उभे होते. यावेळी शहरातील मोहम्मद सईद या इसमाने दुराणी यांच्यासोबत वाद घालत त्यांच्या श्रीमुखात भडकावल होतं. याप्रकाराने बाबाजानी दुर्रानी यांचे समर्थक संतप्त झाले होते. ते हल्लेखोराला धडा शिकवण्यासाठी पुढे सरसावले, मात्र बाबाजानी दुर्रानी यांनीच त्यांना आवरल्यामुळे पुढचा राडा टळला होता. या प्रकाराने बाबाजानी दुर्राणी यांच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. व्यापाऱ्यांनी पाथरी बंदची हाक दिली होती. त्यानंतर आता बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.