---Advertisement---

ब्रेकिंग.. पहिली ते चौथीचे वर्ग सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून होणार सुरू, आरोग्य विभागाने दिली परवानगी

Follow Us:
---Advertisement---

मुंबई: राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाची कोणतीही अडचण नाही, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहेत. मुख्यमंत्री आणि कॅबिनेटच्या बैठकीत यासंदर्भातील अंतिम निर्णय होईल. येत्या दहा दिवसात याबाबत निर्णय होईल, असेही राजेश टोपे म्हणाले.

टास्क फोर्स सोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चर्चा केली. या चर्चेनंतर राज्यात पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सुरू करावेत. मात्र शाळा सुरू करताना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याबाबत दक्षता ठेवावी लागेल. अशा सूचना टास्क फोर्स कडूनही करण्यात आले आहेत. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेतील असेही प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच १२ ते १८ वयोगटातील मुलांना लवकरात लवकर लसीकरण करण्याबाबत टास्क फोर्सने सूचना केल्या आहेत. याबाबत उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!