ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बदली निमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांचा अक्कलकोटमध्ये सत्कार

अक्कलकोट, दि.६ : अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांचा निरोप समारंभ संपन्न झाला.अक्कलकोट उत्तर, अक्कलकोट दक्षिण आणि वळसांग पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम करण्यात आला.

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे कडून पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप काळे आणि सपोनि अतुल भोसले यांनी शाल, फेटा, पुर्ण आहेर देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी संतोष पराने, सैदप्पा इंगळे, अविनाश मडीखांबे, प्रवीण घाडगे, मतीन पटेल,  प्रा. प्रकाश सुरवसे, गोपनियचे धनराज शिंदे यांनी सत्कार केला.

सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!