---Advertisement---

शरद पवारांच्या वाढदिनी अक्कलकोटमध्ये रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

Follow Us:
---Advertisement---

 

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट,दि.८ : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने रविवार दि.१२ डिसेंबर रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे व शहराध्यक्ष मनोज निकम यांनी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम आयोजित केला असून शरद पंधरवडा अंतर्गत तालुक्यात विविध ठिकाणी वैचारिक शिबीर घेण्यात येणार आहेत.

रविवारी सकाळी ११ वाजता सर्जेराव जाधव सभागृहात व्हर्चुअल सभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी मुंबई येथे प्रदेश कमिटीकडून होणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उदघाट्न माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे हे असणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, जेष्ठ नेते सुरेश सूर्यवंशी, शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख, अशपाक बळोरगी, फत्तेसिंह संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर आदी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी शरद पवार यांचा जीवनपट देखील उलगडून दाखवला जाणार आहे. याच कार्यक्रमात शरदचंद्र पवार प्रतिष्ठान व राष्ट्रवादी शिक्षक सेलच्यावतीने गुणवंत शिक्षक पुरस्काराने डॉ. भीमाशंकर बिराजदार यांच्या हस्ते शरद गौरव सोहळा होणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा देखील सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

“यशवंत- शरद प्रतिष्ठान” या नव्या सामाजिक संघटनेची स्थापना देखील होणार असून या प्रतिष्ठानच्यावतीने वाढदिवसानिमित्त ८१ विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले जाणार आहे.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी, सदस्य शरदप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!