अक्कलकोट : थंडीत कुडकुडणाऱ्या ७ हजार ऊस तोडणी कामगारांना धोत्री येथील गोकुळ शुगर्स कारखान्याच्यावतीने ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. कारखान्याचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर विशाल शिंदे यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.
कारखान्याच्यावतीने ७ हजार ऊस तोडणी कामगारांना गोकुळ शुगरच्या वतीने सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आणि अभय दिवाणजी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे होते . व्यासपिठावर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे, उद्योजक अशोक पवार (सांगली), एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर विशाल भैया शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना चेअरमन शिंदे यांनी गोकुळ शुगर्सच्या गळीत हंगामाची त्याच बरोबर गोकुळ परिवाराच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या भविष्यकालीन उपक्रमांची माहिती दिली. तोडणीच्या ठिकाणी उसाच्या फडात जाऊन गोकुळ शुगरच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ब्लॅंकेट पुरवले.खेलबुडे आणि दिवाणजी यांनी गोकुळ शुगरच्या उपक्रमाचे कौतुक करीत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी अमरसिंह क्षीरसागर, चिफ केमिस्ट चंद्रशेखर उमरदंड, प्रॉडक्शन मॅनेजर प्रकाश दिघडे , अकाउंट्स अधिकारी उमेश पवार परचेस अधिकारी अरविंद जंगले, बोरेगावचे सरपंच उमाकांत गाढवे, चुंगीचे उपसरपंच महादेव माने, महेश माने यांच्यासह गोकुळ कारखान्याचे कर्मचारी शेतकरी उपस्थित होते. उमेश पवार यांन