ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हर्रss बोला हर्रच्या गजरात… सिद्धारामेश्वरांच्या जयघोषात होम विधी सोहळा संपन्न

गुरुशांत माशाळ

दुधनी: “बोला एकदा भक्त लिंग हर्रss बोला हर्रss, सिद्धारामेश्वर महाराज की जय, शांतलिंगेश्वर महाराज की जय, श्रीशैल मल्लिकार्जुन महाराज की जय” अशा जयघोषात दुधनी येथील ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धारामेश्वरांच्या यात्रेतील महत्वाच्या विधिपैकी एक असलेल्या होम प्रदीपन सोहळा शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्यसानिध्यात भक्तिमय वातावरणात व उत्साहात पार पडला.

सुरुवातिला येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात यात्रेचे मानकरी इरय्या पुराणीक, चन्नविर पुराणीक यांच्या उपस्थितीत सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य सिद्धाराम मल्लाड, प्रभुलिंग पाटील, शिवानंद हौदे यांच्या हस्ते महा आरती करण्यात आले. होम विधीसाठी लागणाऱ्या लाकडाच्या पाच मोळ्या मांतेश शिवशरणप्पा पाटील परिवारकडून संबळाच्या निनादात होम कट्याकडे आणण्यात आले.

नंदीध्वज आणि पालखी मिरवणुकीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. यामुळे होम कट्ट्याजवळ ठेवुन मानाच्या पाचही नंदीध्वज व पालखीतील श्रींच्या मुर्तिस वेदोक्त पद्धतीने पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी समवेत प्रदिक्षणा घालण्यात आले. त्यानंतर होम प्रदिपन सोहळ्याचे मानकरी वेदमूर्ती ईरय्या पुराणिक व वेदमुर्ती चन्नविरय्या पुराणीक यांनी होम विधीचा कार्यक्रम चालू केला. मंदिर समितीचे सदस्य गीरमल्लप्पा सावळगी, सिद्धाराम येगदी, प्रभुलिंग पाटील, सिद्धाराम मल्लाड यांनी होम कुंडात उतरून होम विधीस प्रारंभ केला.

कुंभार कन्येचा प्रतिक म्हणून बाजरीचा पेंडीस गुलाबी रंगाचा शालू नेसून मणी -मंगळसूत्र, जोडवे, हार-दांडा आदी सौभाग्य अलंकार घालून सजविण्यात आले. पूजाविधी झाल्या नंतर रात्री ०८.३० वाजता होम प्रदिपानाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर उपस्थितांनी एकमेकांना तिळगुळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

★ यांची होती प्रमुख उपस्थिती

यावेळी सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत येगदी, अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकरजी म्हेत्रे, मल्लिनाथ म्हेत्रे, शिवानंद माड्याळ, सातलींगप्पा परमशेट्टी, बसण्णा धल्लू, मलकाजप्पा अल्लापूर, लक्ष्मीपुत्र हबशी, संतोष जोगदे, मांतेश पाटील, महेश गुळगोंडा, शिवानंद फुलारी, भागेश यरगल, श्रीमंतप्पा परमशेट्टी, बाबा टक्कळकी, महेश बाहेरमठ, सुगुरेश बाहेरमठ, राजू खंडाळ, राजू गवंडी उपस्थित होते.

★ पोलिसांकडून चोख बंदोबस्त

यादरम्यान अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक छब्बू बेरड, पोलीस पोलीस हवालदार अजय भोसले, पो.नाईक अल्ताफ शेख, पो. नाईक सुरेश लामजने, सुभाष दासरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!