स्व.आमदार बाबासाहेब तानवडे यांचे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी;तानवडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोटमध्ये विविध कार्यक्रम
अक्कलकोट, दि.२३ : जनसेवक म्हणून स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे यांचेवकार्य पक्षासाठी अतुलनीय होते तसेच भावी युवा पिढीसाठी देखील ते प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी काढले.
अक्कलकोट येथे स्व.आमदार बाबासाहेब तानवडे यांच्या २४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तानवडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली.
पुढे बोलताना डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी म्हणाले, बाबासाहेब तानवडे यांनी पक्षात सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे काम केले. तालुक्याचा विकास व्हावा यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्यांच्यामुळे तीर्थक्षेत्र विकास झाला. हीच परंपरा जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी तालुक्यात सुरू ठेवली आहे त्यांचेही कार्य चांगले आहे,असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील,सभापती आनंदराव सोनकांबळे, प्रभाकर मजगे, मल्लिनाथ स्वामी, प्रा.परमेश्वर आरबळे, राजशेखर मसुती, बाळासाहेब मोरे, सुनील बंडगर, अविनाश मडीखांबे आदींनी तानवडे यांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन केले.
यावेळी नगराध्यक्षा शोभा खेडगी, नगरसेवक महेश हिंडोळे, बसलिंगप्पा खेडगी,तुकाराम बिराजदार, गुंडप्पा पोमाजी, शिवशरण वाले,शिवसिध्द बुळ्ळा, चंद्रकांत इंगळे, सिध्दाराम मठपती, दयानंद उबरजे, विश्वनाथ भरमशेट्टी, सिध्दार्थ गायकवाड, सरपंच बसवराज तानवडे, विजयकुमार तानवडे, प्रविण तानवडे, प्रशांत तानवडे मल्लिनाथ भासगी, प्रवीण शटगार,संयोजक आनंद तानवडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ७८ जणांनी रक्तदान केले.
बाल चिकित्सा शिबिरात ६५ बालकांची तपासणी झाली. नेत्रतपासणी शिबिरात शंभर जणांची तपासणी झाली.पन्नास जणांना लसीकरण करण्यात आले. तर पन्नास दंत रुग्णांची मोफत तपासणी झाली. बालरोग तज्ञ डॉ.दिपक पाटील, नेत्रतज्ञ डॉ.अश्विनी अभिवंत,एमडी मेडिसीन डॉ. वीरभद्र स्वामी, दंत स्पेशालिस्ट डॉ.विवेक करपे, डॉ.मनिषा पाटील आदी तज्ञ डॉक्टरांनी सहभागी होत रुग्णांची तपासणी केली.
आरोग्य शिबीर आणि दंत तपासणी हे समर्थ डेंटल क्लिनिक शिवछत्रपती व्यापारी संकुल येथे पार पडले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तानवडे यांच्यावर आधारित दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.हे सर्व कार्यक्रम जनसेवक आमदार बाबासाहेब तानवडे प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आले.
हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजित तानवडे, अशोक बंदीछोडे, दिपक तानवडे, इब्राहिम कारंजे, मशाक मुल्ला, सिद्धारूढ जोजन, शिवराज तानवडे,मनीष जडे,राजू राठोड, बालाजी बंदीछोडे, धनराज जमगे, कल्याणी डिगगे,चननु फताटे, संगमेश तानवडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लिनाथ दारफळे व प्रा.प्रकाश सुरवसे यांनी केले तर आभार बाबू जवळगे यांनी मानले.
★ काकांचे कार्य जनता विसरणार नाही
काका स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे यांनी तालुक्यासाठी मोठे काम केले आहेत. त्यांचे स्वप्न आता मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. भाजपसाठी त्यांनी खूप मोठा त्याग केलेला आहे. हे कार्य तालुक्यातील जनता कधीही विसरणार नाही. तालुक्यातील जनतेसाठी तानवडे कुटुंबीय सदैव कटिबद्ध आहे – आनंद तानवडे, जिल्हा परिषद सदस्य