---Advertisement---

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचं वादग्रस्त विधान, म्हणाले…! किरीट सोमय्या भाजपाच्या आयटम गर्ल!

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधान नंतर चर्चेत असतना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना एका वादग्रस्त विधान केले आहेत. यामुळे राज्यातील राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नवाब मलिक बोलताना म्हणाले की, मला वाटतं राजकीय क्षेत्रामध्ये किरीट सोमय्या भाजपाच्या आयटम गर्ल सारखे राजकारण करत आहेत. बातमी कशी होईल त्यासाठी आयटर्म गर्लचा कार्यक्रम सुरु आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकारचे नेते आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात किरीट सोमय्या हे कायम आघाडीवर असतात. त्यामुळे सोमय्या आणि महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये अधूनमधून शाब्दिक चकमकी सुरु असतात. आता नवाब मलिक यांनी अंत्यत शेलक्या शब्दात टीका केल्याने भाजप नेते कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहणं गरजेचे आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!