दिल्ली : कॉँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत रजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहेलोत, कॉंग्रेसचे नेते शशी थरूर आणि मनीष तिवारी यांची नावे चर्चेत आहे. यामुळे अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या कही दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या कॉँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रियेला आज पासून सुरू होणार आहे. या साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ३० तारीख ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. या नंतर निवडणूक होऊन कॉँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळणार आहे.