अक्कलकोट: येथील श्री शक्तीदेवी ट्रस्टने गेल्या २५ वर्षापासून नवरात्र महोत्सवासह विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवून नारीशक्तीचा गौरवच केला असल्याचे प्रतिपादन अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका पवित्रा खेडगी यांनी केले. संजय नगर खासबाग येथील शक्तीदेवी ट्रस्टच्या २५ व्या रौप्य नवरात्र महोत्सवा निमीत्त नव्याने बांधण्यात येणाऱ्या शक्तीदेवी सभागृहाचा भुमीपुजन सोहळा घटस्थापनेच्या मुहूर्तावर माजी नगराध्यक्षा अंजनाताई सिध्दे, मिनाक्षी पटेल, सुशिला ठमके, ईरावती गायकवाड, मंडाबाई जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्रा खेडगी यांच्या हस्ते नुकतच संपन्न झाला. यावेळी पवित्रा खेडगी बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचा सत्कार नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष उद्योगपती विश्राम पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर विधीवत पुजेने मंडपात घटस्थापना व श्री शक्तीदेवीजींची मुर्ती स्थापना करण्यात आली. सायंकाळी ७ वाजता वरिष्ठ पत्रकार प्रशांत भगरे यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांच्या हस्ते मंडपातील म्युझिकल विद्युत रोषणाईचा उद्घाटन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप भाऊ सिध्दे, शिवराज बिराजदार, सुरेश व्हाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी उत्सव अध्यक्ष विश्रामजी पटेल, उत्सव उपाध्यक्ष राजु जाधव, ट्रस्ट अध्यक्ष शरणप्पा पाटील, ट्रस्ट उपाध्यक्ष सुनिल सिध्दे, संस्थापक अध्यक्ष बाजीराव जाधव, दत्तात्रय जाधव, अरुण लोणारी, बाबाश्री सुरवसे, मुन्ना राठौर, संतोष पराणे, सुर्यकांत बाचके, काशिनाथ धुमाळ, मारुती टोणपे, वसंत बंडगर, आप्पा शिंदे, देविदास गोबरे, चिंटू भंडारे, प्रकाश कोळी, वैजुनाथ मुकडे, सिध्दाराम माळी,संतोष माने,चंद्रकांत गवंडी, अमर शिरसाठ, निशात निंबाळकर, चंद्रकांत मोटे, अशोक टमके, श्रीमंत चेंडके, अमोल गवंडी, श्रीनिवास गवंडी, अप्पाशा गवंडी, श्रीशैल गवंडी, किरण शिंदे, इरण्णा गवंडी, स्वामीनाथ चव्हाण, भिमा कलाल, कल्लु कासार, समर्थ जाधव, संतोष वाघमोडे, संजय फुटाणे व समस्त देवीजींचे भक्तगण उपस्थित होते.