ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ऐतिहासिक दसरा मेळाव्यात अक्कलकोटकरांनी सहभागी व्हावे; श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे आवाहन

मारुती बावडे

अक्कलकोट,दि.३ : अक्कलकोट संस्थानला तसे पाहिले तर दसरा महोत्सवाची मोठी परंपरा आहे या परंपरेला यावर्षीपासून भव्य स्वरूप प्राप्त होणार आहे नागरिकांनी यात सहभागी होऊन हा महोत्सव पुन्हा एकदा ऐतिहासिक करावा, असे आवाहन अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले. अक्कलकोट संस्थांनचा दसरा महोत्सव इतिहासात भव्य प्रमाणात होत असे. तीच परंपरा श्रीमंत मालोजीराजे राजे भोसले यांनी कायम ठेवली असून दसरा दिवशी बुधवार दि. ५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जुना राजवाडा पासून ते शरणमठापर्यंत राजघराण्याच्या प्रथा आणि परंपरेप्रमाणे रॅली काढण्यात येणार आहे.

तिथे शमी वृक्षाचे पूजन केल्यानंतर परत जुना राजवाडा येथे मुख्य सोहळा होणार आहे. त्यानंतर सिमोल्लंघन केले जाणार आहे. तदनंतर नागरिक आणि राजे परस्परांना शुभेच्छा देतील. राज घराण्याच्या देवघरातील भवानी मातेच्या दर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. अक्कलकोट संस्थानला गत वैभव प्राप्त व्हावे इतिहासाबरोबरच भविष्यातील सुंदर आणि आदर्शवत अक्कलकोट निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे त्यासाठीही नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी केले.

या दरम्यान नागरिकांच्या भेटीगाठी होतील तसेच राजघराण्याच्या देवघरातील दर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
श्रीमंतराव मालोजीराजे शहराच्या प्रमुख मार्गावरून जात असताना नागरिकांच्यावतीने जागोजागी सत्कार आणि पुष्पवृष्टी जाणार आहे. या पत्रकार परिषदेचे स्वागत आणि प्रास्ताविक मानकरी बाबासाहेब निंबाळकर यांनी केले तर आभार स्वामीराव हरवाळकर यांनी मानले. यावेळी सुधीर माळशेट्टी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

तुळजाभवानीला महावस्त्र अर्पण करणार

अक्कलकोट राजघरण्याच्यावतीने १७०७ पासून ते आज पर्यंत महाराष्ट्र कुलस्वामिनी आणि अक्कलकोट राजघराण्याची कुलदैवता तुळजाभवानीला महावस्त्र अर्पण केले जाते श्रीमंत मालोजीराजे भोसले स्वतः तुळजाभवानीला महावस्त्र अर्पण करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!