अक्कलकोट मतदार संघातील तेरा रस्ते सुधारण्यासाठी २ कोटी ६० लाखांचा निधी,आमदार कल्ल्याणशेट्टी यांची माहिती
अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील पायाभूत विकासास महत्वाचा घटक असलेल्या रस्ते विकास निधीतून एकूण
तेरा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी
२ कोटी ६० लाख रुपये इतका निधी
प्राप्त झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.जिल्हा वार्षिक योजनेकडील ३०५४ व ५०५४ या लेखा शिर्षकांतर्गतचे इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यावरील कामे व पंतप्रधान ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या सर्वांमध्ये समन्वय असावा या उद्देशाने
हा निधी मंजूर करण्यात आला आहे.अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील एकूण १३ रस्ते व त्यांना मिळालेल्या
निधींचा तपशील पुढीलप्रमाणे.
★ ३०५४ योजनेतून मंजूर निधी
रामपूर ते राज्यमार्ग (१५ लाख),मैंदर्गी ते जकापूर (२५ लाख),दुधनी ते निंबाळ (२५ लाख),तडवळ ते सुलेरजवळगे (२० लाख),आळगे ते तडवळ (२० लाख),पितापूर ते अकतनाळ (२२ लाख),धोत्री ते बोरामणी (१८ लाख),कासेगाव ते खडकी (१५ लाख),बोरामणी ते दावलमलिक रस्ता (१५ लाख),फताटेवाडी ते तिल्लेहाळ (१० लाख).
★ ५०५४ योजनेतून मंजूर निधी
नागणसुर ते व्हसुर (२५ लाख), हंजगी
ते अक्कलकोट (१५ लाख), बोरामणी ते अरळी (३५ लाख) असे आहे.या मंजूर निधीतून उपरोक्त गावातील रस्त्याचे खडीकरण,भराव,डांबरीकरण आदी आवश्यक कामे करून सदर रस्त्यांची
कामे केली जाणार आहेत. गेल्या
अनेक वर्षांपासून रस्त्यांची कामे मार्गी लागण्यासाठी सतत मागणी व्हायची.
या अगोदर सुद्धा ग्रामीण रस्त्यांसाठी वेगवेगळ्या योजनांतुन मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे.आता पुन्हा तेरा रस्त्यांचा प्रश्न आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याने या निधीतून मार्गी लागणार असल्याने बऱ्याच अंशी दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास
मदत होणार आहे.