---Advertisement---

सोलापुरात जुगार अड्ड्यावर धाड, माजी आमदारासह २९ जणांना अटक

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर :  इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह २९ जणांना जुगार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. सोलापुरातील होटगी रोडवरील क्लब ९ येथे जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. गुन्हे शाखेतर्फे हा हॉटेलवर धाड टाकली असता या ठिकाणी अवैधरित्या जुगार सुरू असल्याचे आढळून आले. धाड टाकल्यावेळी माजी आमदार रविकांत पाटील हे स्वतः हॉटेलच्या बाहेर कार्यकर्त्यासह बसले होते.

मात्र हॉटेलमध्ये पोलीस गेल्यानंतर जवळपास १९ जण हे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून रोख २ लाख २४ हजार ५४० रुपये, ४ लाख १९ हजारांचे मोबाईल, १३हजारांचे जुगार साहित्य असे एकूण ६ लाख ५७ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व आरोपींना रात्री उशिरापर्यंत विजापूर नाका पोलीस ठाण्यात बसविण्यात आले होते.रात्री उशीरा सर्व आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!