ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मैंदर्गी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामासाठी 3 कोटी 39 लाख मंजूर ; केंद्र सरकारच्या आरोग्य मिशन निधीने चांगली सोय

अक्कलकोट,ता.03: मैंदर्गी ता.अक्कलकोट येथील जीर्ण झालेल्या व असुविधेने हैराण झालेल्या रुग्णांना आता दिलासा मिळणार असून त्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी केंद्रीय आरोग्य मिशन अंतर्गत 3 कोटी 39 लाख रुपये एवढा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांच्याकडे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सदर प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीसाठी नवीन बांधकाम करणे गरजेचे असल्याने निधी द्यावी अशी मागणी केली होती.यासाठी सतत पाठपुरावा देखील कल्याणशेट्टी यांनी केला होता.याची तातडीने दखल घेत पवार यांनी केंद्र सरकारच्या आरोग्य मिशन योजनेतून या कामासाठी 3 कोटी 39 लाख रुपये एवढा निधी मंजूर केला आहे.

सोलापूर जिल्हातून मैंदर्गी येथील एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत बांधकाम करिता निधी मंजूर झाला आहे.येत्या काही दिवसात तांत्रिक बाबी पूर्ण करून निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन या कामास प्रारंभ केला जाणार आहे.सदर इमारत बांधकाम पूर्णत्वास जाणार असल्याने रुग्णांना खूप दिलासा मिळून त्यांची सध्या होत असलेली गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

यात बाह्यरुग्ण विभाग,शस्त्रकिया सोय व इतर अनुषंगीक वैद्यकीय उपचाराची अधिक चांगल्या प्रकारे सोय होणार आहे.सध्याची इमारत जीर्ण होती व पावसाळ्यात गळणे तसेंच अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत होता त्यातून आता सुटका होण्यास मदत होणार आहे.

भारतीताई पवार यांच्याकडून माझ्या मागणीची दखल

मैंदर्गी येथे गेल्या अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीस नवीन बांधकाम करिता निधी गरजेचे होते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांनी माझ्या मागणीची व पाठपुराव्याची दखल घेत 3 कोटी 39 लाख एवढा निधी मंजूर केल्याने तालुक्याच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो – सचिन कल्याणशेट्टी आमदार,अक्कलकोट

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!