मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकऱ्यांची ई- केवायसी करण्यासाठी १५ जानेवारी २०२४ ही डेडलाइन दिली होती. मात्र, आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांची ‘ई-केवायसी’ बाकी आहे. त्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.
‘पीएम-किसान’चा चौदावा हप्ता वाटला जात असताना तीन अटींचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रात अवधी ७० लाख होती. परंतु, कृषी विभागाने सातत्याने प्रयत्न करत पंधराव्या हप्त्याच्या वाटपावेळी ही संख्या ८४ लाखांवर नेली. कृषी संचालक दिलीप झेंडे यांच्याकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे.
राज्यात सध्या सुरू असलेल्या ई- केवायसी मोहिमेमुळे आतापर्यंत ८६.४८ लाख शेतकऱ्यांना योजनेच्या कक्षेत आणण्यात आले. ई-केवायसीसाठी ६ डिसेंबर २०२३ पासून राज्यभरात विशेष मोहीम सुरू आहे. कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी काही दिवसांपूर्वीच या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन लक्ष्य पूर्ण करण्याच्या सूचना कृषी यंत्रणेला दिल्या होत्या.