ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अहिल्यादेवींच्या जयंतीला राज्यातून ५० हजार ढोल येणार

आमदार पडळकर यांचा अक्कलकोट येथे सत्कार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

राजमाता  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पुणे येथे पुढच्या महिन्यात राज्यातून ५० हजार ढोल वाद्यवृंद वाजवून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्याचा मानस आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.अक्कलकोट येथील बिरलिंगेश्वर मंदिरातआमदार पडळकर यांचा अक्कलकोट तालुका शहर धनगर समाजाच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला.

त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशचे नेते सुनील बंडगर हे होते.याप्रसंगी माऊली हळवनकर , बापू कारंडे ,बाबुराव जानकर ,मारुती जानकर,सुभाष पुजारी , कमल सोनटक्के , स्वामीनाथ घोडके ,काशिनाथ आलुरकर,महादेव निंबाळ आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत व
प्रस्तावना शंकर व्हनमाने यांनी केले. याप्रसंगी अक्कलकोट तालुक्यातून हजारो ढोल वाद्ये घेऊन पुणे येथे जाण्याचा मानस तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी ठरविले.यावेळी तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष घोडके, अंबाजी बंदीछोडे ,सदाशिव गुड्डे, गंगु पुजारी,आमसिद्ध घोडके ,निंगाप्पा घोडके ,स्वामीनाथ कोरे आदींनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन काशिनाथ आलूरकर यांनी केले तर आभार प्रभाकर बंदीछोडे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!