ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोन्याचा दरात घसरण तर चांदीची तेजी कायम; हे आहेत आजचे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात घसरण झाली होती. 52 हजारापर्यंत पोहोचलेले सोन्याचे दर 46 हजाराच्या जवळ आले होते. मागील आठ महिन्यातील सोन्याचा हा सर्वात कमी दर होता. पुन्हा किंचितशी घसरण झाली आहे. आज गुरुवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली आहे. तर दुसर्‍या बाजूला चांदीमध्ये मात्र तेजी आहे. सोन्याचा भाव 46400 रुपयांच्या आसपास असून चांदी 70 हजारांजवळ आहे.

आज गुरुवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 45750, 24 कॅरेट सोन्याचा भाव 46750 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेटचे दर 45750 तर 24 कॅरेटचे दर 46750 रुपये आहे. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 45550 रुपये आहे. त्यात बुधवारच्या तुलनेत 350 रुपयांची घसरण झाली. 24 कॅरेटसाठी तो 49690 रुपये झाला आहे.

चेन्नईत 22 कॅरेटसाठी 43930 रुपये असून 24 कॅरेटचा भाव 47920 रुपये आहे. कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 45950 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 48650 रुपये आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव 0.3 टक्क्यांनी घसरला आणि 1798.71 डॉलर प्रती औंस झाला. तर चांदीच्या भावात 0.7 टक्के घसरण झाली. प्रती औंस चांदीचा भाव 27.79 डॉलर झाला. प्लॅटिनमच्या दरात 1.1 टक्के घसरण झाली. प्लॅटिनम 1254 डॉलर वर स्थिरावले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!